मराठी भाषिक प्रदेश



मराठी भाषा भारतासह मॉरीशस व इस्त्राएल या देशातही बोलली जाते. त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या महाराष्ट्रीय भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया व न्युझीलंड येथेही बोलली जाते.


भारतात मराठी मुख्यत्वे महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू व छत्तीसगढ राज्यात आणि दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासीत प्रदेशातील काही भागात मराठी बोलली जाते. मराठी भाषक मोठ्या प्रमाणात असलेले भाग- बडोदा, सुरत, दक्षिण गुजरात व अहमदाबाद (गुजरात राज्य), बेळगांव, हुबळी- धारवाड, गुलबर्गा, बिदर, उत्तर कर्नाटक (कर्नाटक राज्य), हैद्राबाद (आंध्र प्रदेश), इंदूर, ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) व तंजावर (तामिळनाडू) हे आहेत.

मराठी सण व उत्सव

गुढीपाडवा - चैत्र शुद्ध प्रतिपदा
रामनवमी - चैत्र शुद्ध नवमी
हनुमान जयंती - चैत्र पौर्णिमा
परशुराम जयंती - वैशाख शुद्ध द्वितीया
अक्षय्य तृतीया - वैशाख शुद्ध तृतीया
आषाढी एकादशी - आषाढ शुद्ध एकादशी
नागपंचमी - श्रावण शुद्ध पंचमी
नारळी पौर्णिमा - श्रावण पौर्णिमा
कृष्णजन्माष्टमी (गोकुळ अष्टमी) - श्रावण कृष्ण अष्टमी
पोळा - आषाढ अमावास्या, श्रावण अमावास्या किंवा भाद्रपद अमावास्या
गणेश चतुर्थी - भाद्रपद शुद्ध चतुर्थी
अनंत चतुर्दशी - भाद्रपद शुद्ध चतुर्दशी
घटस्थापना - आश्विन शुद्ध प्रतिपदा
दसरा (विजयादशमी) - आश्विन शुद्ध दशमी
कोजागरी पौर्णिमा - आश्विन पौर्णिमा
दीपावली (दिवाळी, दिपावळी)
नर्क चतुर्दशी - आश्विन कृष्ण चतुर्दशी
लक्ष्मीपूजन - आश्विन अमावास्या
बलिप्रतिपदा - कार्तिक शुद्ध प्रतिपदा
भाऊबीज - कार्तिक शुद्ध द्वितीया
कार्तिकी एकादशी - कार्तिक शुद्ध एकादशी
त्रिपुरारी पौर्णिमा - कार्तिक पौर्णिमा
चंपाषष्ठी (सट) - मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी
श्रीदत्त जयंती - मार्गशीर्ष पौर्णिमा
मकरसंक्रांत - पौष महिन्यात
दुर्गाष्टमी - पौष शुद्ध अष्टमी
रथसप्तमी - माघ शुद्ध सप्तमी
महाशिवरात्र - माघ कृष्ण चतुर्दशी
होळी - फाल्गुन पौर्णिमा
रंगपंचमी -फाल्गुन कृष्ण पंचमी

मराठी भाषेची ताकद

मराठी भाषेची ताकद खालील २ लेखात पहा. प्रत्येक शब्द 'क' आणि 'प'  पासून सुरु करुन येवढा मोठा
परिच्छेद लिहिला आहे. जगातल्या कोणत्या इतर भाषेत अशी ताकद असेल ?

------------ --------- --------- ------------ --------- --------- ------------ --------- --------- ------------ --------- ---------
केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर
कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत
कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये '
कजरारे-कजरारे' कवितेवर कोळीनृत्य केले.
काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे
कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श
किंचाळून कलकलाट केला.
काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श
कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले.
कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी 'कोलाज'
करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला.
काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा
कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले.
कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय
काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले.
केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या
कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले.
कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर
कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या
कागाळीखोर केशवाला काळानेच केला 'कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता'!
कथासार
-
क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन,
कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे

------------ --------- --------- ------------ --------- --------- ------------ --------- --------- ------------ --------- ---------

परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या
पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या
पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात
पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले.

पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्‍या
पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा
पुरवला.

पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले. पिवळी
पगडी पण पकडली. पोलिसांनी पंकजला पोलिसठाण्याकडे पिटाळले. पकडणारा पोलिस पदपथावर
पाय पसरून पडला. पोलिस पडलेला पाहून पंकज पाठीवर पांघरूण पांघरून पळाला.

पंतांनी पुरंदरला पोहोचताच पगडीत पंकजचे पैशांचे पाकिट पाहिले. पाकिटातले पुष्कळ पैसे पंतांनी
पनवेलला पुत्राला पोस्टाने पाठवले. पंतांच्या पाजी पुत्राने पैशांच्या प्राप्तीतून पोटात पंजाबी
पदार्थ पचवले.

पंतांना परमेश्वरच पावला!
पंकजला पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी प्राची पंकजला पहिल्यांदा
पाहताच पंकजच्या प्रेमात पडली. प्राचीने पंकज, पोलिसांची पकडा पकडी पाहिली. पंकजचा
पदपथावरून पोबाराही पाहिला. पानशेतच्या पुराच्या पाण्यामुळे पुनर्वसित पंकज परत पर्णकुटीत
पोहोचला.

पित्यासमवेत प्राची पुरंदरला परतली, पण पंतांनी पंकजच्या पाकिटातल्या पैशांबाबत पंक्ति-प्रपंच
पाळला. पुष्कळ पैसे पुत्राला पाठवले. पंतांच्या पुन्हा पुन्हा पिडणार्‍या पुराणांच्या पोपटपंचीमुळे
प्राची पेटली.

पंकजच्या प्रेमाखातर प्राची पुण्यास परतली. प्राचीनेच पंकजवरच्या पोलिसांच्या पंचनाम्याला
पाने पुसली. पंकजला पहायला प्राची परत पर्णकुटीपाशी पोहोचली. पण पर्णकुटीत पहुडलेल्या
पंकजचे पाय पळून पळून पांढरे पडलेले! प्राचीने पंकजच्या पायावर पिवळे पुरळही पाहिले.

पंकजची परिस्थिती पाहून प्राण पिळवटलेल्या प्राचीने पदर पाण्यात पिळून पंकजचे पाय पुसले.
प्राचीचा प्रथमोपचार पाहून पंकजला पोरगी पसंत पडली. पंकजने प्राचीला पर्णकुटीतच पटवले.

पर्णकुटीतील प्रेम-प्रकरण पाहून पर्णकुटीच्या पायर्‍यांवर पत्ते पिसणारी पोरे पूर्व-पश्चिमेला
पांगली. प्राचीने पंकजचे पा़किट पैशांविनाच परतवले. परंतू प्रेमात पारंगत पंकजने प्राचीस पाच
पाप्या परतवल्या.

पंतांना परमेश्वर पावला, पण पंकजला पंतांची पायाळू पोर पावली.

------------ --------- --------- ------------ --------- --------- ------------ --------- --------- ------------ --------- ---------
ज्याने हे लिहिलं तो खरंच थोर !!

नक्षत्रे


नक्षत्रे
एकूण २७ नक्षत्रांचे चक्र असते. प्रत्येक नक्षत्राचे नाडी, गण,योनी, तत्व, देवता आहेत.
१) अश्विनी - आद्यनाडी, अश्वयोनी, देवगण, अश्विनीकुमार

२) भरणी - मध्यनाडी, गजयोनी, मनुष्यगण, यम

३) कृत्तिका - अंत्यनाडी, मेषयोनी, राक्षसगण, अग्नि

४) रोहिणी - अंत्यनाडी, सर्पयोनी, मनुष्यगण, ब्रह्मा

५) मृग - मध्यनाडी, सर्पयोनी, देवगण, चंद्र

६) आर्द्रा - आद्यनाडी, श्वानयोनी, मनुष्यगण, शंकर

७) पुनर्वसू - आद्यनाडी, मार्जारयोनी, देवगण, अदिती

८) पुष्य - मध्ययोनी, मेषयोनी, देवगण, बृहस्पती

९) आश्लेषा - अंत्यनाडी, मार्जारयोनी, राक्षसगण, सर्प

१०) मघा - अंत्यनाडी, उंदीरयोनी, राक्षसगण, प्तर

११) पूर्वा - मध्यनाडी, उंदीरयोनी, मनुष्ययोनी, भग

१२) उत्तरा - आद्यनाडी, गोयोनी, मनुष्यगण, अर्यमा

१३) हस्त - आद्यनाडी, महिषीयोनी, देवगण, सूर्य

१४) चित्रा - मध्यनाडी, व्याघ्रयोनी, राक्षसगण, त्वष्टा

१५) स्वाती - अंत्यनाडी, महिषीयोनी, देवगण, वायु

१६) विशाखा - अंत्यनाडी, व्याघ्रयोनी, राक्षसगण, इंद्राग्नि

१७) अनुराधा - मध्यनाडी, मृगयोनी, देवगण, मित्र

१८) ज्येष्ठा - आद्यनाडी, मृगयोनी, राक्षसगण, इंद्र

१९) मूळ - आद्यनाडी, श्वानयोनी, राक्षसगण, निर्‌ऋति

२०) पूर्वाषाढा - मध्यनाडी, वानरयोनी, मनुष्यगण, उदक

२१) उत्तराषाढा - अंत्यनाडी, मुंगुसयोनी, मनुष्यगण, विश्वेदेव

२२) श्रवण - अंत्यनाडी, वानरयोनी, देवगण, विष्णू

२३) धनिष्ठा - मध्यनाडी, सिंहयोनी, राक्षसगण, वसु

२४) शततारका - आद्यनाडी, अश्वयोनी, राक्षसगण, वरूण

२५) पूर्वाभाद्रपदा - आद्यनाडी, सिंहयोनी, मनुष्यगण, अजैकचरण

२६) उत्तराभाद्रपदा - मध्यनाडी, गोयोनी, मनुष्यगण, अहिर्बुध्न्य

२७) रेवती - अंत्यनाडी, गजयोनी, देवगण, पूषा

मराठी महिने


वर्षाचे मराठी महिने बारा असतात परंतु दर तीन वर्षांनी एक महिना जास्त धरावा लागतो त्या तेराव्या महिन्याला
अधिकमास म्हणतात हा अधिकमहिना धरण्याचे कारण काय ?
आपले शक संवत्सर सुमारे ३५४ दिवसांचे असते हे चांद्रमास वर्ष आहे आणि इंग्रजी ३६५ दिवसांचे वर्ष व भारतीय सौरवर्ष यांचा मेळ घालण्यासाठी दर तीन वर्षांनी (३२ महिने १६ दिवसांनी) हा तेरावा अधिकमास ठरवला आहे
दर महिन्याला सूर्य एक राशी संक्रमण करतो पण ह्या तेराव्या महिन्यात सूर्य संक्रमणच नसते म्हणून याला मलमास असेही म्हणतात या मासात लग्नकार्य आदी मंगलकार्ये करीत नाहीत
या अधिकमहिन्यात सूर्याचे कोणतेही राशीसंक्रमण नसते परंतू काही वर्षांनी असे घडते की एखाद्या महिन्याला सूर्य दोन राशींचे संक्रमण करतो त्या विशिष्ट महिन्याला क्षयमास म्हणतात
तो महिनाच त्या वर्षात पाळीत नाहीत ते वर्ष १२ - १=११ महिन्यांचे होईल म्हणून क्षयमास येणा-या वर्षात अधिकमहिने २ येतात म्हणजेच ११ + २ = १३ महिन्यांचे ते वर्ष होते या दोन महिन्यातील क्षयमासापूर्वीचा महिना मंगलकार्यास वापरत नाहीत
परंतु क्षयमासानंतर येणारा अधिकमास हा पुरुषोत्तममास म्हणुन पुण्यकर्मे करण्यास पवित्र समजला जातो


मराठी  आठवडा : आठवडा या शब्दात जरी आठ हा शब्द येत असला तरी त्याचा कालावधी हा आठ नाही तर सात दिवसांचा असतो!
    एका आठवड्यातील सात दिवसांना क्रमाने रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार व शनिवार अशी नावे आहेत.



मराठी महिने                     
चैत्र     
 
वैषाख

जेष्ठ


आषाढ


श्रावण


भाद्रपद


आश्विन


कार्तिक


मार्गशीर्ष


पौष


माघ


फाल्गुन

तिथ्या

मराठी महीने हे चंद्र भ्रमणावर अवलंबून असतात. चंद्रभवनाचा कालावधी हा सुमारे २८ दिवसांचा असतो. मराठी महिन्यांमधे दोन पंधरवडे असतात्. पहिल्या पंधरवड्यास शुक्ल पक्ष व दुसऱ्या  पंधरवड्यास कृष्ण पक्ष म्हणतात. शुक्ल पक्ष पोर्णिमेने संपतो आणि कृष्ण पक्ष अमावस्येने संपतो.

तिथ्या

१ प्रतिपदा

२ द्वितीया

३ तृतीया

४ चतुर्थी

५ पंचमी

६ षष्ठी

७ सप्तमी

८ अष्टमी

९ नवमी

१० दशमी

११ एकादशी

१२ द्वादशी

१३ त्रयोदशी

१४ चतुर्दशी

१५ पोर्णिमा / अमावस्या

आधुनिक मराठी लिपी

मराठी स्वर
अ आ इ ई उ ऊ ऋ ॠ ऌ ॡ ए ऐ ओ औ अ अः


मराठी काना-मात्रा चिह्ने
ा ि ी ु ू ृ ॄ ॢ ॣ े ै ो ौ ं ः ॅ ॉ ँ ्


मराठी व्यंजने
    * क ख ग घ ङ
    * च छ ज झ ञ
    * ट ठ ड ढ ण
    * त थ द ध न
    * प फ ब भ म
    * य र ल व श
    * स ष ह ळ क्ष ज्ञ


मराठी अंक
० १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९